विनी मंडेला – एक शमू न शकलेली आग
हिंसेचे समर्थन मला अजिबात करायचे नाही, आणि कोणी करूही नये. पण दक्षिण आफ्रिकेतील तत्कालीन परिस्थिती विचारात घेता विनी मंडेलांसमोर अन्य कुठले पर्याय होते, हे सांगणेही कठीण आहे. महाभारतात हिंसा झाली नव्हती का? फ्रेंच राज्यक्रांतीत हिंसा झाली नव्हती का? १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात हिंसा झाली नव्हती का? किंबहुना जगातली अशी कुठली क्रांती आहे, की ज्या क्रांतीत निरपराधांचे रक्त वाहिले नव्हते?.......